जासई येथे युवकावर हल्ला, महाराष्ट्र धाबा प्रकरणाचा संबंध असल्याचा आरोप

उरण, प्रतिनिधी

रविवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील जासई गावात एका युवकावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. जखमी युवकाचे नाव प्रेमसिंग यादव (वय अंदाजे ३०) असे असून, तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी जासई महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या प्रकरणी आक्षेप घेतल्याचा राग मनात ठेवून हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येतं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चार जण दोन दुचाकींवरून (क्रमांक नसलेल्या) येऊन जासई गावाजवळ डबा धरून बसले होते. प्रेमसिंग यादव हा तरुण रात्री १२ वाजतांच्या दरम्यान आपल्या घरी परतात असताना या चार जणांकडून त्याच्यावर हला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, तसेच लोखंडी रॉडसारख्या वस्तूने पोटात व डोक्यावरही मारहाण करण्यात आली. प्रेमसिंग यांनी प्रसंगावधान राखत हातावर वार झेलले व तातडीने घटनास्थळावरून दूर पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर जासई गावातील काही स्थानिक युवकांनी त्यांना उरण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथून पुढील तपासणीसाठी त्यांना वाशी येथे हलवण्यात आले असता त्याच्या हाताला आठ टाकेल पडले असून, छातीच्या बरगड्यांनाही दुःखापत असल्याचे नुष्पन्न झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, हातावर खोल जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page