अलिबाग :-अमूलकुमार जैन
रायगड जिल्हयातील नागावं ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नागावं ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच निखिल मयेकर,रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,रायगड जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी जिल्हा परिषद सदस्य कबन नाईक,माजी सरपंच नंदकुमार मयेकर, यांच्यासाहित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आयएसओ मानांकन प्रमाणपत्र सरपंच निखिल मयेकर यांनी कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर ,रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याहस्ते स्वीकारले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले की,नागावं हे गाव नसून एक शहर आहे. नागावं अलिबाग ही दोन जुळी गावे आहेत.नागावं गावाला शहर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नागावं ग्रामपंचायतीने आय.एस.ओ मानांकन प्राप्त केल्यामुळे त्याचा दर्जा कायमस्वरूपी सातत्य राखणेही नागावकरासाठी एक आव्हान आहे. हे आव्हान नागावं कर पेलतील असा विश्वास यावेळी कल्याणकर यांनी व्यक्त केला.चौदा मॉडेल मध्ये हे प्रमाणपत्र विभागले गेले आहे.या प्रमानपत्राचा दर्जा राखण्याचे काम आता ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्यावर आली आहे.नागावं
गावाचा सरपंच निखिल मयेकर यांच्या रुपाने कायापालट होत कायापालट होत आहे हे बाब ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी गौरवास्पद बाब आहे.ग्रामपंचायत पातळीवर आय.एस.ओ मानांकन मिळवणारी ग्राम पंचायत नागावं परिसरातील
या मानांकनासाठी ग्रामपंचायतचे सुसज्ज कार्यालय, ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाज, ग्रामपंचायत कर वसुली व्यवस्थापन, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, ई-प्रणाली-एस.एम.एस सिस्टम द्वारे लोकांना माहिती पुरवण्याची सुविधा, डिजीटलाईजेशन, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आलेली विकासकामे, स्वच्छता व प्लॅस्टिक निर्मुलन, विविध व्याख्याने, विविध शिबिरे, ओपन जीम सुविधा, ग्रामदैवत यात्रा व्यवस्थापन, वृक्षारोपण, सामाजिक-आरोग्यविषयक-शैक्षणिक उपक्रम इत्यादी सर्व निकषांचे प्रत्यक्ष मुल्यमापन करून आज हे मानांकन आपल्याला प्राप्त झाले.
कोकण विभागात पाच जिल्हे येत असून या मध्ये ग्रामपंचायत सरपंच विरोधात अनेक तक्रारी असतात त्याबाबत विरोधक हे अर्ज करीत असतात.
रायगड जिल्हा परिषद मार्फत ग्रामसेवक कर्मचारी यांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.अशी सूचना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांना केली.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की आजचा दिवस हा नागावं करासाठी आनंदाचा दिवस आहे.2020 मध्ये मी रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हातात घेतली तेव्हा माझे स्वप्न होते की जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायत ह्या आय एस ओ मानांकन प्राप्त व्हाव्या असे होते. म्हणून मी माझ्या कर्मचारी यांच्या प्रत्येक सभेला आव्हान करतो की प्रत्येकाने ग्रामपंचायत ह्या आय एस ओ मानांकन प्राप्त करण्यासाठी आव्हान स्वीकारा. आतापर्यंत जिल्हयात 50 पेक्षा अधिक ग्रामपंचायत ह्या आय एस ओ मानांकन प्राप्त झाल्या असुन पुढील दोन महिन्यात अजून पन्नास ग्रामपंचायत ह्या आय एस ओ मानांकन प्राप्त करण्यात यशस्वी होतील यात शंका नाही.जिल्ह्यातील810 ग्रामपंचायतीसाठी अमृत कर नावाचे एक सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केले असून अशा प्रकारचे सॉफ्टवेअर बनविणारा रायगड जिल्हा हा महाराष्ट्र मध्ये नंबर एकचा जिल्हा ठरला आहे.त्याच प्रमाणे राज्यात गेल्या काही वर्षांत प्रशासकीय कार्य पद्धतीत बदल होत आहेत. सरकारी कामकाजात पारदर्शकता तसेच वेगाने कामकाज होण्यासाठी ई-गव्हर्नन्स पद्धतीचा वापर केला जात आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पंचायत राज संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागाअंतर्गत आवश्यक असलेले दाखले मिळण्यासाठी ई-पंचायत प्रकल्प राबवण्यात येत आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतींमधील कागदपत्रांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे.
असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नागावं यांच्या वाटचालीस शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी दिल्या. या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर, ग्रामविकास अधिकारी कदम यांचे अभिनंदन केले
या मानांकनामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर आपल्या नागावं ग्रामपंचायतीच्या नावलौकिकामध्ये आणखी भर पडली असुन ही गोष्ट आपल्या गावासाठी अभिमानास्पद आहे. हे मानांकन मिळण्यासाठी आपल्या गावातील सर्व नागरिकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य मिळाले, या बद्दल सर्वांचे विशेष आभार. इथुन पुढे देखील असेच सहकार्य मिळत राहील, अशी अपेक्षा सरपंंच निखिल मयेकर यांंनी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर यांनी केले