57 वर्षीय गृहस्ताने, पत्नी आणि मुलावर केला जिवघेणा हल्ला

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 57 वर्षीय उद्योजकाने आपल्या पत्नी व मुलावर जीवघेणा हल्ला केला आहे. मात्र या घटनेच्या काही वेळानंतर या वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू वसाहत अशी ओळख असलेल्या अश्विननगरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष कौशिक असं या घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे. ते आपली पत्नी ज्योती व मुलगा देव कौशिक याच्यासोबत अश्विननगरमध्ये राहात होते.

वडिलांचा मुलावर हल्ला

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आशिष कौशिक हे उद्योजक असून, पत्नी ज्योती व मुलगा देव याच्यासह ते नाशिकच्या अश्विननगरमधील शिव बंगल्यात राहत होते. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मुलगा देव आपल्या खोलीत झोपला होता. याचवेळी त्याच्या उजव्या हातावर हत्यारानं वार झाल्यानं तो जागी झाला. त्यावेळी त्याच्या वडिलांच्या हातामध्ये चाकू होता आणि ते त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती त्यांचा मुलगा देव याने दिली. त्यानंतर देव याने वडिलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली व आईच्या खोलीत जाऊन दार आतून बंद केले. मात्र त्याला आपली आई ज्योती देखील जखमी अवस्थेमध्ये पलंगावर पडलेली आढळून आली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page