अलिबाग (अमूलकुमार जैन ): अलिबाग बाजारपेठ परिसरातील ठिकरूळ नाक्यावरील एका दुकानाला भर दुपारी आग लागण्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे वेळीच लक्षत आल्याने तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर याच दुकानाशेजारी पेट्रोलपंप असल्याने आगीच्या भडक्याने मोठा अनर्थ होऊशकला असता. मात्र आगीवर नियंत्रण आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आगीची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, काँग्रेस नेते ऍड.प्रवीण ठाकूर, हर्षल पाटील यांनी घटना स्थळाला भेट दिली