श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उरण तालुक्यात आनंदात साजरा करण्यात आला .
उरण ( दिनेश पवार ): येथील श्री हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळ उरण यांच्या वतीने उरण गणपती चौक येथील श्री हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कीर्तन ,भजन ,महाआरतीसह तीर्थ प्रसाद ,व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे ४ वाजता महापूजा ,पहाटे कीर्तन ,सकाळी ८ ते १२ पर्यंत भजन दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद ,सायंकाळी ४ ते ७ पर्यंत भजन झाले ,रात्री ९ वाजता पालखी मिरवणूक आदि कार्यक्रम होणार असून, अध्यक्ष विपुल पारेख ,उपाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे सचिव रोहित पाटील ,खजिनदार मधुकर नाईक ,सह सचिव रेखा पाटील ,सल्लागार जगदीश भोईर ,सहखजिनदार मनोज म्हात्रे ,व्यवस्थापक नितीन पाटील ,रघुनाथ हातनोलकर आदींचे सहकार्य मिळणार आहे.