उरण ( दिनेश पवार )
नुकत्याच झालेल्या नृत्यमल्हार आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या लोकशाहिर आण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंग मंदिर येरवडा पुणे येथे राज्य स्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली नृत्यकला सादर केली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृष्ण लीला या नृत्यास इयत्ता पहिली ते सातवी या गटामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला; तसेच डुयेट या नृत्य प्रकारामध्ये दीप चव्हाण व रिया बांदिवडेकर या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला. हे दोन्ही डान्स नृत्य मल्हार या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आपल्या मुलांनी सादर केलेली ही कला आपणांस या चॅनलवर पाहता येईल.
याच स्पर्धेत आठवी ते दहावी या गटातील विद्यार्थ्यांनी जय हनुमान या गीतावर नृत्य सादर केले. या नृत्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या दोन्ही नृत्यांचे दिग्दर्शन श्री.मिलिंद म्हात्रे यांनी केले.
या नृत्य स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ . माधुरी प्रभु मॅडम आणि सौ. राजेश्री पाटील मॅडम यांनी परिश्रम घेतले.व करंजा मच्छिमार सोसायटीचे सहकार्य लाभले.
हनुमान जयंती निमित्ताने तेथे झालेल्या स्पर्धांतील नृत्य आज नृत्य मल्हार युट्यूबवर पुन्हा दाखविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.