नवी मुंबई ( मनोज भिंगार्डे ): कळंबोली येथे शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या तर्फे एकाच छताखाली हनुमान जयंतीचा भंडारा व रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीचे आयोजन कळंबोली वसाहतीमधील स्टील मार्केट मधील हनुमान मंदिरात करण्यात आले.या उपक्रमात लोखंड बाजारातील सय्यद हवालदार व फारुक हाजी यांच्यासारख्या व्यावसियांकासोबत सुमारे 50 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. या वेळी भागवत सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडळ 2, व कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर सहभागी झाले होते. शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्यापेक्षा एकमेकांच्या धर्माचा आदर करून जातीय सलोखा कसा राखावा हा आदर्श रामदास शेवाळे यांनी उभ्या महाराष्ट्राला घालून दिला आहे. या उपक्रमात नवी मुंबई पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त भागवत सोनवणे यांनी कौतुक करंन नवी मुंबई पोलीसा तर्फे हनुमान जन्मोत्सव व रमजान च्या शुभेच्छा दिल्या.