महालण विभाग, फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी डॉ. आमोद ठक्कर यांची नियुक्ती

उरण, विरेश मोडखरकर

 रयत शिक्षण संस्थेच्या महालण विभाग, फुंडे, उरण येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. आमोद ठक्कर यांची दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून नेमणूक झाली आहे. डॉ. आमोद ठक्कर हे गेले तीन दशके वीर वाजेकर महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. बाळाराम पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, सौ. भावना घाणेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री. सुधीर घरत महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. आमोद ठक्कर यांनी गेल्या तीन दशकाहून जास्त काळ रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयात काम केले आहे. त्यापैकी सर्वाधिक काळ ते वीर वाजेकर ए.एस. सी. कॉलेज, महालण विभाग, फुंडे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या या सेवेच्या काळात महाविद्यालयाच्या विविध विकास कामांमध्ये तसेच महाविद्यालयाच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत केले आहे. “रयत शिक्षण संस्थेने व सर्व पदाधिकाऱ्यांनी सोपवलेल्या या जबाबदारीला मी अत्यंत विनम्रपणे स्वीकारीत असून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. चंद्रकांत दळवी साहेब, सचिव मा. श्री. विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ ठरवेन, वीर वाजेकर महाविद्यालयाला प्रतिष्ठा, मानसन्मान आणि गौरवाच्या शिखरावर नेण्यास मी कटीबद्ध असल्याचे” डॉ. आमोद ठक्कर यांनी या प्रसंगी सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page