
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आणि हनुमान जयंतीचे अवचित्य साधून, ‘नवराज्य’ या डिजिटल युगाच्या डिजिटल बातमीपत्राला सुरुवात करण्यात आली. उरण तालुक्यातील विमला तलावामधील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते पहिली बातमी शेअर करून, या पोर्टलची सुरुवात करण्यात आली. यावेळी मनोहर भोईर यांनी ‘नवराज्य’ला शुभेच्छा देत, या पोर्टलच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचता येणार असून, सामान्यांच्या समस्यांसह इतर प्रश्नांनाही वाचा फोडली जाईल असा विश्वास दर्शवला आहे. तर समाज सेवक संतोष पवार यांनी बोलताना ‘नावराज्य’च्या माध्यमातून गतिशील पत्रकारिता अनुभवायला मिळणार असून, सामान्यांच्या समस्याच मांडणारे हे पोर्टल असेल असे म्हटले आहे.

या कार्यक्रमासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनशाम कडू, सचिव अजित पाटील, संपादक दिलीप कडू, अनंत नारंगीकर, जगदीश तांडेल, सूर्यकांत म्हात्रे, आशिष पाटील , पत्रकार रमेश थळी, आशिष घरत उपस्थित होते. तसेच, यावेळी , समाजसेवक संतोष पवार , आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आर्यन मोडखरकर, प्रज्ञा मोडखरकर, प्रशांत ठाकूर देखील उपस्थित होते.
