उरण ( प्रतिनिधी ): येथील शहर असो वा शहराबाहेरील रस्ते,बेधडकपणे अतिक्रमणे केलेली पाहायला मिळत आहेत. रस्त्याला लागून असणाऱ्या प्रत्येक गटारांवर आज बेकायदेशीर टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत असताना खुद्द नगरपरिषदेनेच भर चौकांमध्ये रस्त्यावर महिना भारतापासून खड्डा खोदून ठेवण्याचा प्रकार केला आहे. महत्वाचं म्हणजे नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच हा खड्डा मागील महिनाभरापासून आहे त्या अवस्थेमध्येच आहे. मात्र येथून नगरपरिषद कार्यालयात येताना अथवा जाताना एकाही अधिकार्याच्या हि बाब आजवर लक्षात का? आले नाही असा सवाल निर्माण होत आहे. महत्वाचं म्हणजे या परिसरात नगरपरिषद, पंचायतसमिती कार्यालय, एन. आय. हायस्कुल, खेळाचे मैदान तसेच बगीचा असून, नागाव मोरा, बोरी, केगाव येथी मोठी रहदारी या चौकातून होत असते. तर रेतीच्या वेळेस हा खड्ड्या बॅरिकेटिंग नसल्याने अपघाताला कारण बनत आहे. आराधी देखील अशाच प्रकारे जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी याच ठिकाणी खड्डा जोडून ठेवणार आला होता. त्यावेळी उरण तालुका दारातही पत्रकार संघाने पाठपुरावा करून तो खड्डा बुजविण्यास भाग पाडले होते. मात्र सध्या स्थितीमध्ये असणारा खड्डा नागरिकांसाठी धोकेदायक ठरत आहे. हा खड्डा तात्काळ बुजवावा अशी आता मागणी होत आहे.