उरण ( प्रतिनिधी ): — मुंबई गोवा हायवेवरील माणगावनजीक कारच्या अपघातात तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास माणगावजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाल्याने कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. माणगाव जवळील कशेळे नजीक झळलेय या अपघातात कारमधील तीन वर्षीय रिवान आणि सहा महिन्याची रिद्या या चिमुरड्यांसमवेत आजी वैशाली तावडे यांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात मृत पावलेले तावडे कुटुंबीय हे मारुती इस्टीलो कारने बोरिवली येथून देवगड येथिल घरी परतत होते. तर, या अपघातात दोन महिला जखमी झाल्या आहेत.यामुळे, कोकणातील गावी निघालेल्या तावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.