उरण ( प्रतिनिधी ): श्री हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा निमित्त गुरुवार दिनाकं 06 एप्रिल 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदार संघातील पाणदिवे,गिरवले, केळवणे, आंबेवाडी , दिघाटी, मोठाभोम,पागोटे, चाणजे व उरण शहरात उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख श्री महादेव घरत, पनवेल तालुकाप्रमुख श्री रघुनाथ पाटील, उपतालुकाप्रमुख डॉ भरत घरत, शिक्षक नेते श्री नरेश मोकाशी, विभागप्रमुख श्री भूषण ठाकूर, श्री महेंद्र गायकर, प्रताप हातमोडे,संदीप घरत, पागोटे सरपंच कुणाल पाटील, केलवणे सरपंच श्री गुरुनाथ ठाकूर,शिवधन पथसंस्थेचे अध्यक्ष श्री गणेश म्हात्रे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.