
उरण ( प्रतिनिधी ): तळापत्या उन्हाळ्यात एनएमएमटी च्या एसी बस बंद पडू लागल्याने याचा त्रास प्रवाशाना सहन करावा लागत आहे. उरणच्या नागरिकांणा प्रवाससाठी महत्वाची ठरलेली हि सेवा आता डोके दुखी बनत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पर्वास सुरु झाल्यानंतर अर्ध्या रस्त्यात बस बंद पडल्याने दुसरा पर्याय मिळेपर्यंत प्रवाशाना तात्काळत उभे रहावे लागते. तर कित्येकदा प्रवाशांना बंद पडलेल्या बसना धक्का देखील मारावा लागतो. असाच काहीसा प्रकार गुरुवारी नवघर फाटा येथे एनएमएमटि बस उन्हाच्या तडाख्यात बंद पडल्याने नवी मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
उरण ते नवी मुंबई दरम्यानच्या नवी मुंबई महानगर पालिकेची एन.एम.एम.टी. बस सेवा आज उरणच्या प्रवाशांच्या मुख्य सेवा बनली आहे. या सेवेचा उरण मध्ये विस्तार झाला आहे. त्यामुळे पनवेल व पेण तालुक्यातील प्रवाशांनाही या सेवेचा दैनंदिन लाभ घेता येत आहे. सध्या उरण ते नवी मुंबई दरम्यान उरण ते जुईनगर, उरण ते कोपर खैरणे व उरण ते कळंबोली आशा बसेस सुरु आहेत. यातील जुईनगर ते कोप्रोली किंवा वशेणी सेवा ही सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. याचा फायदा या परिसरातील विद्यार्थी, व्यवसायिक आणि चाकरमानी यांना झाला आहे. ही सेवा वातानुकूलित असल्याने जेष्ठ नागरिक व महिलांना आरामदायी प्रवास करता येत आहे.
मात्र या सेवेतील अनेक बसेस या भर रस्त्यात बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरल प्रवाशांचा खोळंबा होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बस वाढीची गरज : उरण ते नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढ झाली आहे. मात्र या मार्गावरील छोट्या आकाराच्या बसेस व कमी संख्या यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. अनेकदा तर उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कोपरखैरणे ते उरण या मार्गावरील बसेसच्या संख्येने वाढ करण्याची मागणीही येथील प्रवासी करीत आहेत.