उरण, वैशाली कडू
कामगार नेते आणि सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी एन.आय.हायस्कूल, उरण येथे सकाळी ८:३० ते ५:०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी खालील रक्तपेढया तसेच काही हॉस्पिटल्स व काही संस्था मोफत ही सेवा मोफत उपलब्ध करून देत आहेत. नवी मुबंई हॉस्पिटल रक्त पेढी, MGM हॉस्पिटल कामोठे रक्त पेढी, सद्गुरू ब्लड सेंटर कोपरखैरणे आरोग्य शिबीर साठी येणारे हॉस्पिटल वेळ ८ ते २ वाजे पर्यत उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन उरण, सुश्रूषा हॉस्पिटल, पनवेल,अपोलो हॉस्पिटल, बेलापूर, तसेच या शिबिरात रक्त तपासणी, ई.सी.जी., डोळे तपासणी, बी.एम.डी. (हाडांची तपासणी) मोफत केली जाणार आहे. तसेच चष्मे सवलतीच्या दरात मध्ये दिले जातील.
दिनांक- शुक्रवार दि. ६ ऑक्टोंबर २०२३रोजी वृक्षारोपण सकाळी ९:३० वाजता, लोकनेते दि.बा.पाटील इंजिअरिंग काॅलेज फुंडे येथे करण्यात येणार आहे. “स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर” वेळ सकाळी ११ वाजता, जे.एन.पी.टी. मल्टी पर्पज हाॅल , जेएनपीटी, टाऊनशिप, येथे तर अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी ४:०० वाजता ठिकाण- मल्टी पर्पज हाॅल, टाऊन हॉल, जेएनपीटी टाऊनशिप येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री.संतोष पवार सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सोहळा समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.