जे.एस.एस.रायगड चे संचालक डॉ विजय कोकणे ह्यांचा ”स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर” म्हणून सन्मान

विश्व कल्याण व राष्ट्रहितासाठी दिला सकारात्मक मानसिकता व कौशल्य वृद्धी चा संदेश

मुंबई ( प्रतिनिधी ): डॉ. विजय हिरामण कोकणे -संचालक जन शिक्षण संस्थान  रायगड महाराष्ट्र यांचा 8 एप्रिल 2023 रोजी दिल्ली येथे ”गोल्डन स्पॅरो” द्वारा आयोजीत ” *”G-20 शिखर परिषद”* कार्यक्रमासाठी *”स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर”* म्हणून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “भारत देश ह्यावर्षी G-20 चे अध्यक्षपद भुषवत असताना भारत भरात विविध राज्यंमध्ये मोठ्या स्वरूपत विविध विषयांवर G-20 चर्चा सत्र व शिखर परिषदांचे आयोजन केले जात आहेत सदर परिषदांमद्दे देश विदेशांमधील नामांकित व्याख्याते त्यांचे विचार ,अनुभव राष्ट्रहीत व विश्व कल्याणाच्या दृष्टीकोनातून मांडत आहेत. ह्याचाच एक भाग म्हणून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉ. विजय हिरामण कोकणे -संचालक जन शिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांचा 8 एप्रिल 2023 रोजी दिल्ली येथे ”G-20 शिखर परिषद”* कार्यक्रमासाठी ”स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर” म्हणून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.” विश्व कल्याण व राष्ट्रहितासाठी सकारात्मक मानसिकता व कौशल्य वृद्धी गरजेची आहे असे मत मनोगता प्रसंगी डॉ. विजय हिरामण कोकणे ह्यांनी व्यक्त केले ” या निमित्ताने ”गोल्डन स्पॅरो” ह्या आयोजकांच्या माध्यमातून एकाच दिवसात ३२० पेक्षा जास्त मानवजातीच्या हितासाठी विविध विषयांवर काम करणाऱ्या संपूर्ण देशातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणून एकाच G-20 शिखर परिषद व विचारमंचावरून मत प्रदर्शन करण्याचा विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न सदर G-20 आंतरराष्ट्रीय समिट” कार्यक्रमात करण्यात आला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page