उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्यात सुरू असलेल्या यात्रा पालख्यांच्या हंगामात चक्री जुगाराने मात्र राजेशाही थाट मिळविला असल्याची सनसनाटी माहिती हाती आली आहे. चक्री जुगारात प्रवीण असलेले अगदी आपला खिसा घासेपर्यंत आत्ता जिंकू नंतर जिंकू अशा आशेने रात्रभर खेळत असल्याने चक्री जुगार लावणारे मात्र रात्रभरात लाखोंची कमाई करीत आहेत . यात कुणाचे तरी जाणार तेंव्हाच कुणाला तरी जिंकायला मिळणार हा साधा नियम असतानाही आपण आत्ता नाही जिमकलो तर नंतर जिंकू या आशेने खेळणारे अनेक तरुण मात्र बरबाद होत असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे न्हावा शेवा पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर यात्रा पालखीच्या दिवशी जसखार गावात अशा प्रकारच्या चक्री जुगाराच्या माध्यमातून लाखो रुपायांची उलाढाल झाली मात्र याबाबत न्हावा शेवा पोलिसांना कानोकानी देखील खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील यात्रा पालख्याच्या निमित्ताने लाखो रुपायांची उधळण होत असल्याचे सनसनाटी वृत्त हाती आले आहे. जसखारामध्ये तर थेट मराठी शाळेच्या पटांगणातचं सुमारे सत्तर ते ऐशी जुगारऱ्यांनी खेळ मांडला होता . या चाकरी जुगारातून लाखोंची उलाढाल झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र न्हावा शेवा पोलिसांकडे याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नाहीय. आत्ता येत्या बुधवारी उरण पूर्व भागातील सर्वात मोठी यात्रा असलेली कोप्रोली गावातील यात्रा भरणार असल्याने चक्री जुगार लावणाऱ्यांचा मोर्चा या यात्रेकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने ही हुतात्मा स्मारकाच्या पलीकडील भागात मोठ्या प्रमाणात चक्री जुगार गेले काही वर्षे अगदी दरवर्षी लागत असतो तसाच तो याही वर्षी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय या बाबतीत कोणती भूमिका बजावते ते पहावे लागणार आहे, जुगाराने अनेक कुटूंबे बरबाद होत असताना अगदी खिसा घासे पर्यंत जुगार खेळण्याची सुविधाच उपलब्ध न झाल्यास जुगार बसण्याचा काही संबंधच येणार नाही मात्र पोलीस आत्ता याबाबत काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.