खोपोली, प्रतिनिधी

मुंबई, पुणे महामार्गवर खोपोली एक्सिट जवळ वाहनांचा विचित्र अपघात झाला असून, या अपघातामध्ये 11 लहान कार आणि दोन ट्रक यांच्यात एकमेकाला जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातामधील वाहने सुरक्षित ठिकाणी हळविण्यात आली आहेत. तर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. अपघातामधील रुग्णांना उपचारासाठी हळविण्यात आले आहे. 13 वाहनांमध्ये झालेल्या या विचित्र अपघातामध्ये लहान वाहनांचेइतर नुकसान झाले असले तरी, यामध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. “अपघात ग्रसतांच्या मदतीला” संस्थेचे सदस्य, वाहतूक नियंत्रण कक्ष, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा घटनास्थळावर मदतकार्य करत आहेत.