उरण, आशिष घरत
उरणजवळील करळ पुलावर झालेल्या कंटेनर ट्रेलर आणि मोटारसायकलच्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला आहे, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.
गुरुवारी सकाळच्या सुमारास उरण जवळील करळ पुलावर कंटेनर ट्रेलर आणि मोटारसायकलचा अपघात झाला होता. यावेळी, पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर ट्रेलरची मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला होता. यामध्ये, मोटारसायकलवर असलेले वडील आणि मुलगा हे रस्त्यावर कोसळल्याने या अपघातात मुलगा कौशल याचा मृत्यू झाला आहे. तर, मोटारसायकल चालविणारे अविनाश घोगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना करळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
अपघातातील जखमी हे उलवे येथे वास्तव्यास असून उरण येथील मॅन – लॉजीस्टिक्स या कंपनीत कामाला होते. सकाळी कामावर आले असता कामानिमित्त जेडब्ल्यूआर कंपनीत जात असताना अपघात झाल्याने कौशल याचा मृत्यू झाला आहे.