अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील तक्रारदार कर्मचारी यांच्या वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून अप्पर कोषागार अधिकारी इंगळे यांच्यासाहित लेखा लिपिक जाधव यांच्यावर कारवाई करीत अटक केली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी अप्पर कोषागार अधिकारी रमेश सिताराम इंगळे,( वय 57 वर्षे, रा.ठि. रुणकेश्वर अपार्टमेंट, बालाजी नाका, अलिबाग, रायगड वर्ग 2) व मनोज रावसाहेब जाधव, (वय 32 वर्षे, लेखा लिपिक, जिल्हा कोषागार कार्यालय अलिबाग रायगड.रा.ठि. विजया सोसायटी, पहिला मजला, रोहिदास नगर, गणपती मंदिरच्या मागे, अलिबाग, रायगडवर्ग 3) यांनी तक्रारदार यांचे वैद्यकीय बिल मंजूर करण्याकरिता दि. 22/06/2023 रोजी दोन हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारत असताना आरोपी लोकसेवक
मनोज रावसाहेब जाधव यानी आरोपी लोकसेवक
रमेश सिताराम इंगळे यांनीं दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, स.फौ.अरुण करकरे, विनोद जाधव, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर,विवेक खंडागळे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. असे आवाहन लाच लुचपत विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे.