अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात असणाऱ्या अठ्ठावीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २७१ सार्वजनिक तर १०२५९१ठिकाणी खासगी घरगुती असे एकूण १०२८५८ श्री गणेश मुर्ती विराजमान होणार आहेत त्याचप्रमाणे १४४५५ गौरीचे आगमन होणार आहेत. यानिमित्त रायगड जिल्हयात धामधूम सुरू झाली आहे.
कोकण म्हंटले की उत्सवांची आठवण येते. आणि कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई,पुणे,त्याचप्रमाणे महाराष्ट्रासहित इतर राज्यातील चाकरमानी आपापल्या गावी येतात.एक दिवसावर आलेला हा गणेशोत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो. आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थीला होणार आहे.प्रामुख्याने कोकणात घराघरात गणेशोत्सव श्रद्धेने साजरा होतो. मुंबई व अन्य ठिकाणी असलेले जिल्हावासीय चाकरमानी या निमित्ताने आपापल्या गावी येतात .दीड दिवसापासून अनंत दिवसापर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी नंतरही थांबतात.कारण काही ठिकाणी २१ दिवसापर्यंत गणपती असतात. हा सण सुरळीत व शांततेत व्हावा यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन खबरदारी घेत असून या निमित्त वाढलेली वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाचा कटाक्ष असतो.रेल्वेनेही यावर्षी मोठ्या प्रमाणात गणपती साठी खास कोकणात सोडल्या आहेत.याशिवाय मुंबई गोवा महामार्गावर खासगी व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस तसेच खासगी बस सेवा तसेच आपापल्या खासगी वाहनांतून मोठ्या प्रमाणात वाहनांनी भाविक दाखल होत आहेत.त्यामुळे रेल्वे स्थानके बस स्थानक या गर्दीने फुलले आहेत.
रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहेगणपतीच्या शाळा गजबजल्या असून मूर्तिकार अखेरचा हात फिरविण्याच्या गडबडीत आहेत.काही शाळांमधून तर बाप्पाला आपल्या घरी नेण्याचे काम सुरू झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात १०२५८१ठिकाणी तर २७१ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव अलिबागचा राजासह जिल्ह्यातील ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव होत आहे.