कर्जत, गणेश पुरवंत
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, कार्यक्रमाची सूरूवात करण्यात आली.
संस्थेचे चिटणीस श्री.संदीप भोसले, श्री.पद्माकर गांगल,ग्रंथपाल श्री.रामदास गायकवाड.यांनी वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर या दिवसाचे निमित्त साधून वाचनालयाने एक अगळा वेगळा शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेच्या माध्यमातून लेखन स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेमधे कर्जत मधील आठ शाळांनी सहभाग घेतला. प्रत्येक शाळेने इयत्ता 9 वी व 10 वी चे प्रत्येकी निवडक पाच विद्यार्थ्यी पाठविले होते. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा हाच उद्देश संस्थेने ठेऊन स्पर्धेचे आयोजन केले. डाॅ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा. शाळा-महाविद्यालयात असताना प्रत्येक विद्यार्थांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, हे उद्दिष्ट वाचनालयाने वाचन प्रेरणा दिवसाच्या माध्यमातून कथा वाचन व त्याचे लेखन साध्य करण्याचा प्रयत्न केला .पण फक्त शालेय पुस्तकी वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. अवांतर वाचन केल्याने विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते. इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होते.
कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष सौ. गायत्री परांजपे, चिटणीस श्री. संदीप भोसले, सहचिटणीस श्री. सदानंद जोशी सदस्य श्री. राजेश थत्ते, सहा.ग्रंथपाल योगिता साखरे लिपीक श्रीराम गांगल शिपाई श्रीम.वनिता गायकवाड शाळेतील विद्यार्थ्यांस आणि पालक पूनम जगताप उपस्थित होते.