उरण, विरेश मोडखरकर

जागतिक फार्मसिस्ट दिना निमित्त सामाजिक आणि फार्मसी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभूषिंचा, तसेच संस्थांचा पुरस्कार या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलने सुरु केला आहे. या पुरस्काराच्या पहिल्याच वर्षाचे मानकरी उरणमधील ‘ओमसाई मेडिकल स्टोअरचे’ मालक फार्मासिस्ट मनोज ठाकूर हे ठरले आहेत. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडून यावर्षापासुन समाजामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या फार्मासिस्ट आणि संस्थांना पुरस्कार देण्याचे ठरविले होते. हे पुरस्कार जागतिक फार्मासिस्ट दिनाचे अवचित्या साधून देण्यात आले आहेत. दरम्यान यावर्षीचा आणि पुरस्कारातील पहिला वैयक्तिक पातळीवरचा मुंबई ,कोकण विभागातून पहिला राज्यस्तरीय पुरस्कार उरणमधील ‘ओम साई मेडिकल स्टोअरचे मालक, फार्मसिस्ट मनोज जगन्नाथ ठाकूर यांना देण्यात आला आहे. गेल्या १८ वर्षानपासुन ते करत असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या उल्लेखनीय कार्याची नोंद प्रशासनाने यावेळी घेतली आहे. ते मागील १८ वर्षांपासुन वनवासी कल्याण आश्रमाचे उरण तालुका अध्यक्ष म्हणून आदिवासी क्षेत्रात काम पाहत आहेत. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, एक फार्मासिस्ट म्हणून आपली जावबदारी ओळखून, नागरिकांना औषधंबाबत माहिती देणे, गरजू आणि गरीब समाजासाठी मोफत औषधंचे वाटप करणे, आदिवासी बांधवांसाठी वैद्यकीय उपचार शिबीरे घेणे, यासारखी अनेक कामे ठाकूर यांनी त्यांच्या १८ वर्षांच्या कार्यात केली आहेत. महाराष्ट्र राज्य फार्मासी काऊन्सीलकडून या कार्याची दखल घेत मनोज ठाकूर यांना पुरस्कार दिल्याने, त्यांना राज्यभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. फार्मासिस्ट मनोज ठाकूर हे उरण तालुका केमिस्ट असोसीएशनचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान रायगड जिल्हा केमिस्ट असो चे संचालक (ऑफिस बेरर) म्हणून कार्यरत आहेत. तर रोटरी क्लब ऑफ उरण चे ते माजी अध्यक्ष आहेत. या पुरस्कारामुळे रायगड जिल्हा मधील केमिस्ट बंधावत आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर भावी काळात अधिक सामाजिक कार्य त्यांच्याकडून जोमाने करण्यात येतील असे फार्मासिस्ट मनोज ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.