उरण, वैशाली कडू
उरण रेल्वे स्थानका जवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. ती मागणी मान्य करून रस्त्याच्या दोन्ही साईडला गतिरोधक बसविण्यात आले आहे. यामुळे वहान चालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उरण रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहन चालकांवर वेगाचे नियंत्रण रहाणार नाही. यामुळे अपघात घडण्याची शक्यता होती. हे टाळण्यासाठी सदर मुख्य रस्त्यावर बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली होती. ती मागणी मान्य होत रस्त्याच्या दोन्ही साईडला गतिरोधक बसविण्यात आले आहे.
उरण रेल्वे स्थानकाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविल्याने अपघाताची शक्यता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वहान चालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.