पालघर, प्रतिनिधी
प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली.
हत्या करून फरार झालेल्या तरुणाला सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे. पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची प्रेमसंबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे. स्नेहा पुरुषोत्तम चौधरी, वय १९ वर्षे असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडेल वय २१ वर्षे याला सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.