महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंती दिनी अभिवादन

उरण, प्रतिनिधी ( घन:शाम कडू )

परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अतीशय उत्साहात उरण शहरात सालाबाद प्रमाणे आज साजरी करण्यात आली.या प्रसंगी उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री. राहूल इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री क्षिरसागर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीपन शिंदे आणि माजी नगराध्यक्ष, नगरसेवक विविध राजकीय, सामाजिक, पत्रकार संघटनांचे नेते उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे अतीशय उत्स्फूर्त पणे उरण नगरपरिषदचे कर्मचारी श्री संतोष कांबळे यांचे चिरंजीव कु. अरव , कु. सकस्म आणि श्री. शुद्धोधन जाधव यांचे चिरंजीव कु आर्यन यांची बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित अतीशय दर्जेदार भाषणे झाली या तीनही युवकांचे कामगार नेते संतोष पवार , अँड. विजय पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री घनश्याम कडू (राजा) , कामगार नेते श्री मधुकर भोईर यांच्या हस्ते अरव, सकस्म आणि आर्यन यांना सन्मानित करण्यात आले. कारण हि पुढे येणारी पिढी समाजाचे पर्यायाने देशाचे आधारस्तंभ घडणार आहे असे मनोगतातून कामगार नेते संतोष पवार यांनी व्यक्त करताना भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकरांनी ७० वर्षांपूर्वी सांगितले होते या लोकशाही व्यवस्थेत जेव्हा या देशातील नागरिकांना आपल्या मतांचे मुल्य समजेल तेव्हाच खर्या अर्थाने लोकशाही नांदेल असे अमुल्य विचार व्यक्त केले होते आज या विद्यार्थ्यांच्या भाषणाने हे बाबासाहेबांचे समाज प्रबोधनाचे कार्य पुढे पुढे नेण्याची आजची आणि उद्याचीही गरज आसणार आहे. मी म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे मी ही भावना ह्र्दयात ठेवून या देशातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची भाषणे झाली. उपस्थितांचे स्वागत आणि आभार महेंद्र साळवी , विजय पवार , कल्पेश कांबळे, प्रकाश कांबळे यांनी केले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विनम्र अभिवादन. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादान.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page