खोपोली, प्रतिनिधी
पुण्याकडून मुंबईकडे निघाली होती बस
जुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये 40 ते 45 प्रवाशी असून, यातील 11 प्रवाशाचा मृत्यू झाला असून, 28 प्रवाशी जखमी माहिती मिळत आहे. या अपघातानंतर दरिमध्ये उतरून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत आहे. तर घटनास्थळावर अपघातग्रस्ताच्या मदतीला, हायकर्स ग्रुप, आयआरबी टिम बच्छाव कार्य करत आहेत. अपघात मोठा असून, रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या अपघातग्रस्त बस मध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) प्रवास करत होते, अशी माहिती मिळत आहे. पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना हा अपघात झाला आहे.