अलिबाग :-अमूलकुमार जैन
अलिबाग-रेवस मार्गावर शनिवारी सायंकाळी दोन मोटारसायकलस्वारांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही बाईकवरील चौघेजण जखमी झाले. त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबईला नेण्यात आले आहे.

रेवसकडे जाणारा मोटारसायकलस्वार आणि अलिबागकडे येणारा मोटारसायकलस्वार यांची भीषण धडक झाली. एका मोटारसायकलवरुन तिघेजण प्रवास करीत होते. ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनावरील चौघेजण फेकले गेले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर झाल्याने चौघाजणांनाही तातडीने मुंबईला पाठविण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झालेली होती. अपघाताची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.