पनवेल, प्रतिनिधी
पनवेल आगारामध्ये उरणला येणाऱ्या प्रवाशाना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. तळपत्या उन्हामध्ये तसंतास बससाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. हवामानातील उष्मा वाढला असून कडक उन्हामुळे अनेक नागरिकांना भोवळ येणे तसेच उष्माघाताचे प्रकार देखील होत आहेत. मात्र येथील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे बसची संख्या वाढवावी आणि प्रवाशांसाठी निवारा शेड उभी करावी अशी मागणी होत आहे.
दररोज हजारो नागरिक उरण पनवेल असा प्रवास करत असतात. यामध्ये कामगारवर्ग, विद्यार्थी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक त्याचप्रमाणे इतर गावी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. तर विश्वासाचा आणि खिशाला परवादाणारा प्रवास म्हणून राज्य शासनाच्या एसटी महामंडळाच्या बस सेवेचा वापर अधिक केला जातो. मात्र हाच प्रवास आता नागरिकांना जीवघेणा वाटूलागला आहे. पनवेल बस आगारामध्ये उरण स्थानकामध्ये प्रवाशाना तसंतास बसची वात बघत उभे रहावे लागत आहे. यापूर्वी अशाचप्रकारे बसची वात पाहिल्यानंतर बस आली की नागरिक जागा मिळवण्यासाठी एकच गर्दी करत असत. यावेळी वादविवाद हा नित्याचाच भाग झाला होता. तर या गर्दीमध्ये चोऱ्या देखील होऊ लागल्या होत्या. यामुळे रांगेमध्ये उभे राहून बसमध्ये चढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या प्रक्रियेमुळे वादविवाद आणि चोऱ्या रोखल्यागेल्या आणि प्रवाशी व्यवस्थित बसमध्ये बसुलागले. हीच पद्धत आजपर्यंत सुरु आहे. मात्र सध्या या रांगेमध्ये कडक उन्हामध्ये तसंतास उभे रहावे लागत असल्याने, याचा त्रास प्रवाशांना होऊलागला आहे. येणाऱ्या बसची वात पहात उभ्या असणाऱ्या प्रवाशामधील अनेक जेष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाला भोवळ येण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. तर सध्याच्या वाढत्या उष्म्यामध्ये उष्माघाताचे प्रकार देखील होत आहेत. यामुळे येथील प्रवाशाकडून बसची संख्या वाढवण्याची आणि या स्थानकावर निवांरा शेडची उभारणी करावी अशी मागणी होत आहे.
बातमी आवडली असल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा….