विधवा व निराधार महिलांना ग्रामपंचायत भेंडखळचा आधार

उरण (प्रविण पाटील)

     उरण तालुक्यातील ग्रामपंचायत भेंडखळ या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सौ.मंजिता मिलिंद पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सन्मानिय सदस्य यांना विश्वासात घेऊन, भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत विधवा महिला करिता एक विशेष कार्यक्रम राबवून त्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 15 % मागासवर्गीय इतर खर्चातून निधी वाटप करण्याचे ठरले. त्यानुसार प्रत्येक विधवा महिलेस आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या फंडातून दिनांक १७/४/२०२३ रोजी एक ऐतिहासिक उपक्रम राबवून ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक विधवा महिलेस वार्षिक रक्कम रुपये ६००० /- इतकी रक्कम अनुदान रूपाने देऊन, गावातील अशा एकूण १७२ विधवा व निराधार महिला वर्गाला गौरविण्यात आले.

भेंडखळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून विधवा महिलांना आर्थिक आधार देणारी भेंडखळ ग्रामपंचायत ही रायगड जिल्हयामधील उरण तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीच्या पाहिल्याच निर्णयाने दुर्बल घटकांना आधार मिळवून दिल्याबद्दल भेंडखळ ग्रामपंचायतीचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page