अलिबाग, अमूलकुमार जैन
पोलिसांनी आरोपीकडून जवळपास दोन लाख तेरा हजार किंमतीच्या आठ बाईक्स जप्त केल्यात. याप्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करताहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या चोरीचा तपास करणे रायगड पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने या मोटर सायकल चोरीचा छडा लावत विक्रम राम कालेकर, (वय. 36, रा. यशवंत नगर,खराडी, पुणे मूळ रा.लाडवली,ता.पनवेल, जि. रायगड) व अनुराधा विवेक दंडवते, (वय.31, रा. रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा.75/4, पर्वती पायथा, स्वारगेट ,पुणे ) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जवळपास दोन लाख तेरा हजार किंमतीच्या आठ बाईक्स जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करताहेत.
रायगड जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. दिवसागणिक मोटरसायकल चोरी जात असल्याने याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून तपास करण्याचे काम सुरू केले. यादरम्यान रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटर सायकल चोरी झालेल्या घटनास्थळावरून प्राप्त सीसीटीव्ही. फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार राकेश म्हात्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदार मार्फत माहिती घेतली. सदर फुटेज मधील संशयित आरोपीत हे पुणे येथील राहणारे असून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता, त्याने त्याची महिला साथीदार हीचे मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. अधिकच्या चौकशी मध्ये सदर आरोपीने असे 10ताब्यात मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याबाबत आरोपी यांच्याकडे अधिक चौकशी करीत असता त्यांच्याकडून पेण पो.स्टे.गु.र.नं. 102/23, भा.द.वि.क. 379,पेण पो.स्टे. गु.र.नं. 76/23, भा.द.वि.क. 379,पेण पो.स्टे.गु.र.नं. 06/22, भा.द.वि.क. 379,रसायनी पो.स्टे.गुर.नं. 33/23, भा.द.वि.क. 379,रसायनी पो.स्टे.गुर.नं. 35/23, भा.द.वि.क. 379,रसायनी पो.स्टे.गुर.नं. 85/22, भा.द.वि.क. 379,रसायनी पो.स्टे.गुर.नं. 84/23, भा.द.वि.क. 379,रसायनी पो.स्टे.गुर.नं. 83/22, भा.द.वि.क. 379.खांदेश्वर पो.स्टे.गुर.नं. 215/22, भा.द.वि.क. 379, (नवी मुंबई),खांदेश्वर पो.स्टे.गु.नं. 216/22 भा.द.वि.क. 379,(नवी मुंबई) आदी पोलीस स्टेशन मधील गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 2,13,000/- रु. किमतीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, सहाय्यक फौजदार कोरम, पोलीस हवालदार दीपक मोरे, पोलीस हवालदार झेमसे, पोलीस हवालदारराजा पाटील,पोलीस हवालदार सावंत, पोलीस हवालदार म्हात्रे, महिला पोलीस शिपाई चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोलीस नाईक तुषार घरात व पोलीस नाईक अक्षय पाटील यांनी केली आहे.
बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…