प्रतिनिधी, प्रज्ञा मोडखरकर
सध्या वातावरणातील उष्मा अधिकच वाढत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच असल्याने, नागरिक थंड हवेचे ठिकाण, समुद्र किनारे अशा ठिकाणी पर्यटनासाठी जाताना दिसत आहेत. मात्र तरीही उष्मा जाणवत असल्याने, शीतपेय आणि बर्फगोळयाचा थंडावा घेत आहेत. काहीकाळ का नाही मात्र थंडाव्याचे उत्तम स्रोत शीतपेयाच्या आणि बर्फगोळ्याच्या गाड्या ठरत आहेत.
उन्हाचा वाढता पारा पाहाता, घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. मात्र कामानिमित्त बाहेर पडणे गरजेचे असल्याने, नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. त्यातूनच शाळाना सुट्या पडू लागल्याने, वर्षभर बाहेर न गेलेली मंडळी फिरण्याच्या उद्देशाने बाहेर पडत आहेत. वातावरणातील वाढता उष्मा पाहाता पर्यटनासाठी नागरिक थंडा हवेचे ठिकाण, समुद्र किनारे यासारखी ठिकाणे निवडत आहेत. मात्र जागतिक स्थरावर वाढत्या उष्म्याची समस्या अधिकच तीव्र होत असताना, पर्यटनही कठीण झाले आहे. यातूनच काहीसा थंडावा मिळावा यासाठी नागरिक शीतपेय आणि बर्फगोळ्याच्या गाड्यांचा आधार घेत आहेत. यामुळे नागरिक अशा ठिकाणांवर गर्दी करताना दिसत आहेत. तर उन्हाच्या तडाख्यापासुन वाचण्यासाठी गमछाचा वापर देखील करताना दिसत आहे.
बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा….