उरण, प्रतिनिधी
चिरनेर गावातील स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण व रंगरंगोटीचे काम नवीमुंबई परिसरातील में.पी.पी.खारपाटील कंपनी तसेच पी.पी.खारपाटील चँरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष पी.पी.खारपाटील व राजाशेठ खारपाटील या दांपत्यानी स्वखर्चाने हाती घेतले आहे.त्यामुळे चिरनेर गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त करुन खारपाटील कुटुंबाचे आभार व्यक्त केले आहेत.
चिरनेर हे इतिहास प्रसिद्ध गाव असून अशा महत्त्वाच्या गावातील रहिवाशांच्या मूत्यू नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. सर्वांच्या जीवनाशी निगडित असलेल्या स्मशानभूमीच्या नुतनीकरणाचे काम नवीमुंबई परिसरातील यशस्वी उद्योगपती पी.पी.खारपाटील व राजाशेठ खारपाटील या दांपत्यानी स्वखर्चाने पाच वर्षांपूर्वी हाती घेऊन आपले काका कै.गोटुराम धाकू खारपाटील यांच्या नावाने सदर स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता.