अलिबाग, अमूलकुमार जैन
मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर यांची अलिबाग न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.

उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर यांना लाचलुचपत विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी ताब्यात घेतले होते. त्यांनतर त्यानंतर त्यांना 26 एप्रिल2023 रोजी अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी परत अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना काही अटी शर्तीवर जामिनावर मुक्तता केली आहे. उसरोली ग्रामपंचायत येथे 25 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी तक्रारदार यांच्याकडून शेडच्या असेसमेंट साठी त्यांनी पन्नास हजार रुपये मागितले असता तक्रारदार यांनी लाच लुचपत विभाग यांच्याकडे तक्रार केल्याने सदरची कारवाई करण्यात आली होती. लाच लुचपत विभागाच्या कारवाई आणि चौकशी मध्ये सरपंच मनीष नांदगावकर यांनी पूर्णपणे सहकार्य केले असल्याचे तपास अधिकारी यांनी सांगितले.