उरण, प्रतिनिधी
जलद प्रवाससाठी गेली पंचवीस वर्षे लोकल ट्रेनची वाट पाहणाऱ्या उरणकरांना अजून लोकल सुरु होण्याची वाट पहावी लागणार आहे. खारखोप ते उरण या उर्वरित पट्ट्याचे काम घाई घाइत पूर्ण केल्यानंतर शुभारंभच्या अनेक तारखाच्या वावड्या उठल्या होत्या. तर याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारले असता, प्राधानमंत्री कार्यालयातून सूचना आल्या की शुभारंभची वेळ निश्चित करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. यामुळे पंचवीस वर्ष वाट पहावी लागलेल्या लोकलच्या शुभारंभसाठी अजून किती वाट पहावी लागणार? असा सवाल नागरिक करू लागले आहे.
उरण लोकल प्रकल्प हा सुरुवातिपासूनच विविध अडचणीच्या गर्तेमध्ये सापडल्याने, या प्रकल्पला खूप उशीर झाला आहे. सुमारे पंचवीस वर्षे येथील नागरिकांनी लोकल प्रवासासाठी तग धरला असून, या प्रकल्पच्या शुभारंभासाठी अजून वाट पहावी लागणार आहे. सीएसटी ते उरण हा थेट प्रवास या लोकलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने, हा प्रकल्प उरण प्रमाणेच उलवे, बेलापूर, वाशी आणि मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणार आहे. अनेक अडचणी पार केल्यानंतर या प्रकल्पचा पहिला टप्पा हा खारखोप पर्यंत पूर्ण करण्यात आला होता. तर या मार्गवर सध्या लोकल प्रवास सुरु देखील आहे.
यांनंतरचा खारखोप ते उरण हा दुसरा टप्पा सर्व अडचणी दूर झाल्यानंतर पूर्ण करण्यासाठी घाई करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक रेल्वे रुळ, इलेक्ट्रिक केबल, सिग्नल यंत्रणा, स्थानके, कारशेड यांची उभारणी देखील करण्यात आली. तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी जोरात काम सुरु आहे. मात्र मार्च महिन्यामध्ये या प्रकल्पच्या कामाच्या जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या. यावेळी मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत लोकल सुरु होणार अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावरून वायरल झाले होते. तर स्थानके आणि इतर सर्व बाबींची तपासणी देखील करण्यात आली होती. तर या मार्गवरून लोकल चालवून चाचण्या सुद्धा पूर्ण करण्यात आल्या होत्या. यामुळे लोकल सेवा लवकरच सुरु होणार अशी खात्री झाली होती. मात्र चाचणी दत्म्यान आलेल्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, प्राधानमंत्री कार्यालयातुन वेळ निश्चित झाली की शुभारंभ करण्याचे ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले होते. तर मार्च महिन्यापासुन शुभारंभच्या अनेक तारखाच्या वावड्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उठल्या होत्या. मात्र शुभारंभसाठी आवश्यक कामे उरकूनही तारीख निश्चित होत नसल्याने, पंचवीस वर्षानंतर लोकल संदर्भात पल्लवीत झालेल्या आशांनवर पाणी फेरण्यात आले आहे. यामुळे अजून किती वाट पहावी लागणार असा सवाल नागरिक करत आहेत.
बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…..