प्रतिनिधी, श्वेता भोईर
रॉयल ग्रुप फाऊंडेशन आणि बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जुईनगर येथे रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरास स्वस्तिक ब्लड बँक, कामोठे यांचे सहकार्य लाभले.

उन्हाळ्यात रक्तपुरवठा कमी पडतो. त्यामुळे या शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रक्तदाते हेच जीवनदाते हे लक्षात घेऊन समविचारी युवा एकत्र येऊन रक्तदान शिबीर आयोजित करत राहू अन् सेवाभाव जपत राहू असा दोन्ही संस्थांनी मानस व्यक्त केला. अशाप्रकारे कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला. यावेळी रॉयल ग्रुपचे संस्थापक सागर गवारे, अध्यक्ष स्वप्नील जरे, प्रशांत गोरडे, अक्षय जानभोर, सूरज निकम, सचिन निघोट, तान्हाजी चव्हाण, सुनिल गावडे, मनोज गायकवाड, स्वप्निल गव्हाणे, समर भुजबळ, राजू गिलके उपस्थित होते. तर बांधिलकी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अविनाश म्हात्रे, ॲडवोकेट तुषार शेडगे, अशोक घाडगे, अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, स्वप्निल मुटके, विशाल कावरे, सुदर्शन म्हात्रे, समीर जाधव, मनाली नरसाळे कावरे, अरुणा तुपे उपस्थित होते. त्याचबरोबर विशेष उपस्थिती म्हणून जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव, क्रिएटिव्ह फाऊंडेशन उपाध्यक्ष अमोल सपकाळ व सहकारी, मनविसे शहर सह सचिव नवी मुंबईचे स्वप्निल जोशी, ॲडवोकेट सचिन शिंदे, महेश असोलकर, किरण निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.
Good work