नवीमुंबई, मनोज भिंगार्डे
नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेचा यंदाचा दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. या निकालामुळे विद्यार्थी, पालकांचा व शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सेंट जोसेफ विद्यालयाने यंदा ही आपली परंपरा राखत या वर्षी देखील शंभर टक्के यश संपादन केले आहे. या विद्यालयातील 673 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी मानाचा तुरा खोवला आहे या विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
कुमारी प्रांजली प्रकाश पाटील 97.20%
कुमार अथर्व राजाराम पाटील 96.80%
कुमारी अवनी प्रवीण जोशी 96.00 टक्के
असे या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झाले आहेत विद्यालयातील सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून रयान इंटरनॅशनल ग्रुप ऑफ स्कूलच्या मुख्य संचालिका मॅडम ग्रेस पिंटो यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यमान मुख्याध्यापिका फरजाना तुंगेकर व पर्यवेक्षिका निलोफर चांदले यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली कठोर परिश्रम व जिद्द जोपासणाऱ्या शिक्षकांचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.