उरण, विरेश मोडखरकर
पावासाळा सुरु होताच सापाचे मानवी वस्तीमध्ये दिसण्याचे प्रमाण वाढूलागते. अशावेळी सर्पमित्र सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम करतात. अशाच प्रकारे उरण शहरातील बालई गावामध्ये जाळ्यात अडकलेल्या एका धामान सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून त्याला जीवनदान देण्यात आले आहे.

उन्हाळ्याच्या उष्णतेपासुन बचाव करण्यासाठी आडोष्याचा अथवा बिळाचा आफहार घेतलेले साप पाऊस पडताच बाहेर निघणायास सुरुवात होते. अशातच हे साप भक्ष मिळवण्यात मानवी वसतिमध्ये शिरकाव करतात. सापांबाबत ज्ञान नसणाऱ्या सामान्य नागरिकांकडून अशा सापानां मारण्यात येत होते. यामुळे सापांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गवर होत्या. तर साप हा निसर्गाचक्रातील महत्वाचा प्राणी असल्याने, प्राणीमित्रांकडून अनेकवर्षे संपणबाबत समाज, गैरसमजाबाबत जनजागृती करण्यात होती. याचा परिणाम म्हणून साप मारण्याची प्रथा बंद होऊन सर्पमित्रांच्या सहाय्याने पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात येऊ लागले. उरण तालुक्यातील आजच्या आढाव्यानुसार प्रतिदिवस किमान दहा सापाना जीवनदान देण्याचे काम येथील सर्पमित्र करत आहेत. अशाचप्रकारे उरण शहरामधील बाळाई या गावामध्ये जाळ्यामध्ये अडकलेल्या एका धामाण जातीच्या आठ फूट लांबी असणाऱ्या सापाला सर्पमित्र प्रवीण (भद्री) पाटील याने पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून त्याला जीवन दान दिले आहे.