अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील रोहा शहरापासून नजीक असणाऱ्या भुवनेश्वर येथील निवृत्त तहसीलदार मोहन साठे यांच्या घरी झालेल्या घरफोडीचा तपास मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास करीत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात यश प्राप्त केले आहे.

रोहा नगरपालिका हद्दीतील भुवनेश्वर शिल्पनगरी येथे राहणारे निवृत्त तहसीलदार मोहन साठे यांच्या मालकीच्या असलेल्या बंद घरात 27 जुलै2023 रोजी रात्रौच्या सुमारास घरफोडी करीत चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. घराच्या आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा उठवून चोट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. ऐवजात चोरीत दागिने, रोकड यांसह अन्य मौल्यवान वस्तूचां समावेश होता.चोरीची घटना समजताच श्वान पथक, फिंगर पथक यंत्रणा शोधार्थ तातडीने दाखल झाली. पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

मोहन साठे हे कामानिमित्त काही दिवस बाहेर गावी गेल्याने त्यांनी एका व्यक्तीवर घराची जबाबदारी दिली, ते धाटाव एमआयडीसीतील कंपनीत रात्रौ कामावर गेल्याचे समजताच चोरीचा हा गंभीर प्रकार घडला होता. चोरट्यानी दरवाजा शेजारील ग्रील उपटून काढून खिरकीद्वारे चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले. चोरट्यांनी आधी समोरील सीसीटीव्ही कॅमेरा वर केला, दुसरे अतिशय शिताफीने मोडतोड करून टाकले आणि खिडकीतून घरात आत प्रवेश केला असल्याचे घटनाक्रमातून दिसत होते.
सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कडील पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, यांनी केलेल्या तांत्रिक अन्वेषणावरून सदर गुन्हयातील आरोपी मध्यप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, असे पथक गठीत केले. सदर पथकाने मध्यप्रदेश येथील दुर्गम भागातील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे येथे जावून मध्यप्रदेश येथील गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार भैरवसिंग देवडा, सहाय्यक फौजदार रामसिंग गौरे पोलीस शिपाई आर बलराम, राखीव प्रशांत सिंग चौहान, यांच्या मदतीने दुर्गम भागातील कैला कमरू डावर,( वय-26 वर्षे), निहाल सिंग गोवन सिंग डावर,( वय-40 वर्षे),सोहब इंदरसिंग डावर, (वय-36 वर्ष) सर्व रा. गेटा ता.कुक्षी जि.धार, राज्य मध्यप्रदेश यां गुन्हयाचे कामी धैर्याने ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी रोहा येथे घरफोडी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली.
सदर आरोपीत यांना स्था.गु.शा. शाखेकडे आणून त्यांना गुन्हयाचे कामी अटक करून त्यांच्याकडून गुन्हयात गेलेला एकुण माल 30.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो वजनाचे चांदीचे भांडे असा संपुर्ण 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करून गुन्हयाचे कामी जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बाळासाहेब खाडे, यांचे अधिपत्याखालील सहायक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार/ अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, सायबर विभागाचे पोना तुषार घरत, पोशि अक्षय पाटील यांनी यांनी रोहा येथील घरफोडीतील आरोपींना मध्यप्रदेश येथील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागातून ताब्यात घेवून चोरी केलेला सर्व 100 टक्के मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.