साळाव ते आगरदांडा रस्ता लवकरच होणार ! निविदा प्रक्रियेस सुरुवात आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन

मुरुड शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा संपन्न

अलिबाग, अमूलकुमार जैन

गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना अपेक्षित असणारा साळाव ते आगरदांडा रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण लवकरच करण्यात येणार असून या रस्त्यासाठी हॅम्प योजनेतून सुमारे तीनशे कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच येत्या १५ दिवसात या कामाची निविदा प्रक्रिया निघणार असून सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे प्रतिपादन अलिबाग-मुरुड चे आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.

मुरुड शहरातील विविध विकासकामाचें लोकार्पण सोहळ्यासाठी ते मुरुड मध्ये आले असताना उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते
मुरुड बोट क्लब इमारतीचे दर्यासारंग विश्राम गृह लोकार्पण,नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 चे नुतनीकरण करून लोकार्पण करणे,श्री दत्त देवस्थान मंदीर नुतनीकरण व परिसर सुशोभीकरण यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.या कामाचे भूमिपूजन करणे,जल शुध्दीकरण केंद्र या विकास कामाचे लोकार्पण,मुरुड नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे निवास स्थान नवीन स्वरूपात बांधून लोकार्पण करणे,मुरुड शहरातील स्म्शानभूमी येथे विविध पायाभूत सेवा करून गॅस शव वाहिनी कार्यान्वित करून लोकार्पण करणे,मुस्लिम कब्रस्थान बाजारपेठ येथील पायाभूत सुविधा विकास कामे करून लोकार्पण करणे,मुरुड नगरपरिषद कार्यालयाचे नुतनीकरण करून लोकार्पण करणे आदी सर्व विकास कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी जिल्हा उप प्रमुख भरत बेलोसे, मुरुड तालुका संघटक दिनेश मिणमिने, विघ्नेश माळी,जिल्हा संघटिका शुभांगी करडे,मुरुड शहर प्रमुख संदीप पाटील,मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,माजी नगराध्यक्ष अशोक धुमाळ,माजी नगराध्यक्ष रहीम कबले,सी.एम.ठाकूर,संजय गुंजाळ,सुपारी खरेदी विक्री संघाचे चेरमन बाबा दांडेकर,मुख्याधिकारी पंकज भुसे,गिरीश साळी, तहसीलदार रोहन शिंदे,निलेश घाटवळ,आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार दळवी म्हणाले कि,मागील ठेकेदाराने हा रस्ता रखडवला होता.त्यामुळे अलिबाग -मुरुड तालुक्याला याचा मोठा त्रास सहन करावा लागला.यासाठी शिवसैनिकांनी रस्ता रोखून या कामाबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली होती.सर्व आंदोलकर्त्यांचे अभिनंदन सुद्धा यावेळी त्यांनी केले.उपस्थितांना मार्गदर्शन करताना यावेळी आमदार दळवी म्हणाले कि,लवकरच मुरुड तालुक्याचा समावेश एम.एम.आर.डी मध्ये समावेश करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष प्रस्ताव सादर केला असून याबाबतची कार्यवाही सुद्धा सुरु झाली असून अलिबाग प्रमाणेच मुरुड तालुक्याचा हि समावेश होणार असल्याने तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे.
राज्यात शिंदे-भाजप सरकार आले म्हणून विकासकामांसाठी भरघोस निधी प्राप्त होऊ लागला आहे..प्रशासक असल्यामुळेच मुरुड शहराचा विकास झाला आहे.आगामी काळात मुरुड नगरपरिषदेत कोणास उमेदवारी द्यवायची हे मी ठरवणार असून नगरपरिषद निवडणुकीचे पॅटर्न तयार करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.मुरुड मधील क्रीडांगण,स्मारक हि उर्वरित कामे येत्या काळात पूर्ण करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे चेहरे लोकांनी वाचले आहेत.त्यांनी आपल्या कालावधीत कोणता विकास केला कि स्व विकास केला हे मतदाराना चांगले ठाऊक असून लवकरच नगरपरिषद निवडणुकीत त्यांना त्यांची त्यांची जागा मतदार दाखवून देतील असा विश्वास यावेळी आमदार दळवी यांनी व्यक्त केला आहे.मुरुड नगरपरिषद हॊल मध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवकांचा सत्कार सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
विविध लोकार्पण सोहळ्यासाठी मुरुड शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page