ग्रामस्थांच्या तक्रारीस केराची टोपली:अनधिकृत बांधकामे पूर्ण झाली तरी संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
अलिबाग, मूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा आगरकोट येथे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावराच गेल्या काही महिन्यांपासून पुरातन विभागासाहित,महसूल,ग्रामपंचायत यांच्यासाहित इतर शासकीय विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू केलेली अनधिकृत बांधकामे ही आता पूर्ण होत आली आहेत.मात्र सदरची अनधिकृत बांधकामे पूर्ण झाली तरी संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असतानादेखील शासकीय विभागाकडून कारवाई होत नाही हे नवलच.
करण्यासाठी विविध उपाय योजना करत आहे मात्र ग्रामस्थ व इतिहासप्रेमी मंडळीच्या तक्रार अर्जास केराची टोपली दाखविली जात असून या तक्रार अर्जाच्या दुर्लक्षतेने या पुढे ऐतिहासिक वास्तू व अवशेष नाहीसे होण्याच्या मार्गावर असल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष विरेश मोरखडकर यांनी म्हटले आहे. .