कोकण विभाग पदवीधर मतदार संघ पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

अलिबाग:- अमूल कुमार जैन

अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष भारतातील विद्यापीठाचा पदवीधर किंवा त्याच्याशी समकक्ष शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तींनी या कार्यक्रमाची नोंद घेऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक 18 भरावा लागणार आहे. तो नमुना मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान नोंदणी अधिनियमांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.
दिनांकाच्या कमीत कमी 3 वर्ष अगोदर पूर्ण झालेली पदवी/ पदवीत्तर पात्रता 2. सदर दिनांक हा 30 ऑक्टोंबर 2020 येतो म्हणेजच पात्र मतदाराची पदवी किया पदवीत्तर शिक्षण 30 ऑक्टोंबर 2020 पूर्वी पूर्ण झालेली असावी.
मतदार हा पदवीधर मतदार संघातील रहिवासी असावा. 4. मतदाराची पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण भारतातील कोणत्याही विद्यापिठाची झालेली असेल ती ग्राहय मानली जाईल. 5. पदवी परिक्षेचा निकाल घोषित झालेला दिनांक 3 वर्षाची मुदत ठरवितांना विचारात घेतला जाईल.

Bमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणसाठी अर्ज दाखल करण्याची पद्धतीमध्ये नमुना 18 मधील अर्ज नाव नोंदणीसाठी दाखल करता येतो..ज्या मतदारांचे नाव अगोदर पदवीधर मतदार यादीत आहे त्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावा लागतो.जुन्या पदवीधर मतदार यादीत नाव आहे ही मतदाराची पात्रता नाही.नमुना 18 च्या अर्जासोबत पदवी / पदवीत्तर शिक्षणाची सनद किंवा गुणपत्रकाची झेरॉक्स कॉपी राजपत्रित अधिकाऱ्यांची साक्षांकित केलेली जोडावी. मतदारांचे शपथपत्र तसेच विद्यापिठाच्या रजिस्टारचे किंवा कॉलेजच्या प्राचार्यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. एकगठठा पध्दतीने अर्ज सादर करता येणार नाही. तथापि संस्थेचे प्रमुख पात्र मतदारांचे अर्ज एकत्रित सादर करु शकतील किंवा मतदार एकाच पत्त्यावर राहत असलेल्या त्याच्या कुटूंबातील सदस्याचे अर्ज एकत्रित सादर करु शकतो. पंरतू राजकिय पक्ष किंवा BLA एकगठठा पध्दतीने अर्ज सादर करुन शकणार नाहीत. एकगठठा पध्दतीने अर्ज समक्ष किंवा पोस्टाने पाठवु शकतात.जेव्हा मतदार मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा
पदनिर्देशित अधिकारी यांचे समक्ष अर्ज सादर करेल अशा वेळेस त्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेचे मुळ पुरावे ( Original Copies) तपासणीसाठी सादर करावे लागतील. अशा वेळी संबंधित अधिकारी अर्जदाराच्या अर्जावर शैक्षणिक पुरावे मूळ प्रतीवरुन तपासले व ते बरोबर आढळून आले किंवा बरोबर आढळून आले नाहीत असा शेरा लिहुन सही करेल आणि जर तो पदनिर्देशित अधिकारी असेल तर आपला पिन नंबर नमुद करेल. मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा पदनिर्देशित ठिकाणी नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्यात यावे. या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणी ही रायगड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व सर्व तहसिल कार्यालय येथे सुरु आहे. पदवीधर मतदारांसाठी नमुना 18 व शिक्षक मतदारांसाठी नमुना 19 चा फॉर्म वरील कार्यालयांमध्ये उपलब्ध असून त्याठिकाणी नोंदणी करता येईल. पदवीधारक मतदार नोंदणीसाठी रंगीत फोटो, रहिवासी पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स व पदवी प्रमाणपत्र याच्या सत्यप्रती तसेच शिक्षक मतदार नोंदणीसाठी ज्या संस्थेमध्ये शिक्षक पदावर तीन वर्ष अध्यायनाचे काम केले आहे त्यासंस्थेकडील अभिलेखानुसार प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त मतदार नोंदणीची फॉर्म मंडळ स्तरावर उपलब्ध करु देण्यात येतील. तरी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी* :-
मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करणे- दि. ३० सप्टेंबर, २०२३ (शनिवार). मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी- दि. १६ ऑक्टोबर, २०२३ (सोमवार). मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिद्धी- दि. २५ ऑक्टोबर, २०२३ (बुधवार), नमुना १८ व्दारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख- दि. ६ नोव्हेंबर, २०२३ (सोमवार). हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदारयाद्यांची छपाई- दि. २० नोव्हेंबर, २०२३ (सोमवार).
प्रारूप मतदारयाद्यांची प्रसिध्दी- दि. २३ नोव्हेंबर, २०२३ (गुरुवार), दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- दि. २३ नोव्हेंबर, २०२३ (गुरुवार) ते दि. ०९ डिसेंबर २०२३ (शनिवार), दावे व हरकती निकाली काढण्याची तारीख, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दि. २५ Hundre
d, २०२३ (सोमवार), मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी- दि. ३० डिसेंबर, २०२३ (शनिवार).

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page