उरण, विरेश मोडखरकर
“गो ग्रीन” उपक्रमाअंतर्गत पीएसए अमेया लॉजिस्टिक खोपटे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था चिरनेर ,वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे ,महाराष्ट्र प्रतिष्ठान पाणदिवे यांच्या संयुक्त विद्यमाने आज 27 सप्टेंबर रोजी चिरनेर परीसरातील चांदायली आदिवासी वाडी येथील, बेलडोंगरी आनंद वनात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
आज दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. याकडे शासनही गांभीर्याने लक्ष देत असून, महाराष्ट्र शासन आणि वनविभागातर्फे वृक्ष लागवड आणि संवर्धन केले जात आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड आणि सवर्धनामध्ये पीएसए अमेया लॉजिस्टिक खोपटा येथील कंपनीने हातभार लावत वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचे काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज वृक्ष लागवड करण्यात आले आहे. यासाठी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था, वटवृक्ष सामाजिक संस्था, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावेळी अमेया व्यवस्थापनचे असिस्टंट जनरल मॅनेजर नंदकिशोर सानस, गिरीश म्हात्रे, प्रशांत पोटे, सेफ्टी ऑफिसर परमजीत सिंग, अडमीन असिस्टंट जनरल मॅनेजर शुभांगी म्हात्रे ,जान्हवी म्हात्रे, छाया पाटील ,नागराज नायक ,विकास चौधरी, श्याम ढाणे,गणेश ठाकूर,व्ही एच नवशाद ,हिलरी मिरिंडा तसेच वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थे तर्फे अध्यक्ष विवेक केणी उपाध्यक्ष दिलीप मढवी ,मनोहर फुंडेकर ,महेश भोईर ,पंकज घरत ,विष्णू मोकळ ,वाडीतील भरत् कातकरी आदी उपस्थित होते.