कर्जत प्रतिनिधी, गणेश पुरवंत
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत मेरी माटी…मेरा देश उपक्रम राबविण्याचा केंद्र शासनाच्या सूचना होत्या. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर याकाळावधीत ग्रामपंचायत स्तरावर गावनिहाय प्रत्येक घरातून एक मूठ माती किंवा एक चिमूट तांदूळ गोळा करण्यात आले. तसेच १ ते १३ सप्टेंबर सूचना होत्या त्या नुसार ११ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता या यात्रेला भाजपचे प्रदेशअध्यक्ष बावन कुळे यात्रेत सहभागी होऊन, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. जिल्ह्यातून महाड, पोलादपूर, तळा, अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, सुधागड, पाली या तालुक्यातून “अमृत माती” कलश घेऊन सर्व लोक प्रतिनिधी पनवेल शहरातून मुंबईच्या दिशेने प्रस्थापित झाले. पुढे प्रत्येक कलशातील माती एका अमृत कलशात टाकून हा अमृत कलश सन्मान पूर्वक दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. याचवेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून देशाभिमान जागृत होईल अशी माहिती सांगितली.
अमृत कलश यात्रेसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावन कुळे, पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, कर्जत येथून नितीन कांदळगावकर, अनिल जैन, संदीप मस्कर, मंगेश मस्कर, राजेश भगत, दिपक बहिरे, भाजपचे रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या यात्रेस व आढावा बैठकीसाठी उपस्थित होते.