उरण, अजय शिवकर
आजच्या देवीचे तिसरे रूप, चन्द्रघंटा
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या ‘चंद्रघंटा’ या रुपाची आराधना केली जाते. या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनीयुक्त दागिने परिधान करतात.चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे, आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चाराने मात्रे आपले मन सजग होऊन, आपल्या नियंत्रणात येते.
जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेंव्हा आपले मन,आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.
आज पाहू या उरणच्या तिसऱ्या शक्तीची माहिती
उरण, करंजा गावची द्रोणागिरी माता

इ.स.११ व्या शतकाच्या दरम्यान उरण वसण्यापूर्वी येथे खूप जंगल होते. आता सात पाडे असणाऱ्या करंजाला तुरळक दोन तीन घरे असावीत. एकदा एक गुराखी वरचा राईचा भाग पार करून डोंगराच्या पार गुरे चरायला गेला असता त्याला पाषाण रुपी मूर्ती सापडली. तीन टेकड्या पार करून, त्याने ही मूर्ती आणली. पण राईच्याभागात येताच जड झाली. त्याने तिथेच ती ठेऊन खाली जाऊन काही लोकांना घेऊन आला. पण मूर्ती जागेवरून हलली नाही. मग तिथेच देवीची स्थापना करण्यात आली. असे म्हणतात, हनुमान लक्ष्मणासाठी संजिवनी घेऊन जाताना हातातुन काही तुकडे पडले. त्या पर्वतांपैकी हा डोंगर म्हणजे द्रोणागिरी पर्यत. किल्ल्याचेही नाव त्याचवरून ठेवले असावं. द्रोणागिरी पर्वत व किल्ल्यावरून देवीचे नाव आई द्रोणागिरी माता असे असावे. वर्षभर देवीच्या मंदिरामध्ये प्रत्येक सण साजरे करण्यात येतात. मोठ्या भक्तीभावाने भाविक देवीचे दर्शन घेत असतात. नऊरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या मंदिरात अखंड भजन कीर्तन सुरु असते. विशेष म्हणजे या नऊ दिवसात टाळ, मृदूंग एका क्षणासाठीही खाली ठेवले जात नाही. तर या नऊ दिवसात राज्यातून तसेच राज्यात बाहेरूनही भक्तगण दर्शनाला येत असतात.

उद्या बुधवार
१८/१०/२०२०
उद्याच्या देवीचे चौथे रूप — कुष्मांडी
उद्याच्या देवीची माहिती—पिरवाडीची मांगीनीदेवी माता