कर्जत, गणेश पुरवंत
कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी सेवा संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष आनंदराव मरागजे ह्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. 27/07/2023 रोजी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे साखळी उपोषण केले होते. सदर प्रसंगी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत सभा लावण्याचे अभिवचन दिले होते. त्या अनुषंगाने आज दि.18/10/2023 रोजी सायंकाळी ठिक 4.00 वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल-मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन तसेच पुनर्वसनमंत्री अनिल पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी ह्यांच्या समवेत सकारात्मक बैठक संपन्न झाली.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी 60 वर्षात पहिल्यांदाच आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्यातून मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक लावली गेली. आमदार साहेबांनी पुढाकार घेत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती केल्याबद्दल आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांचे सकल कोयना समाजबांधवांच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत.