उरण, अजय शिवकर
संदर्भासाठी फोटो, सौजन्य गूगल
उरण, नागाव येथून उरण ते शिर्डी पदयात्रा मंडळाच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजतां घडली. पालखी दिंडीमधील भरधाव वाहनाने चार सदस्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान यातील एका सदस्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती हाती लागली आहे. या अपघातामध्ये १) दीपक नथुराम म्हात्रे, नागाव २) ओमकार किशोर तेलंगे ३) हेमंत पाटील, दांडा अशी जखमीची नावे असून, मृत व्यक्तीचं नाव हरिश्चंद्र महादेव भोईर, मोठीजुई असे सांगण्यात येत आहे. तर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर अपघातानंतर घटनास्थळावरून पोबारा केलेल्या वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.