कर्जत तालुक्यात ७ पैकी ६ ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गट, युतीचे पारडे जड

कर्जत, गणेश पुरवंत

कर्जत तालुक्यात अंभेरपाडा, खांडस, नांदगाव, नसरापूर, गौरकामथ, वदप ओलमण या सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तर कळंब व हुमगांव येथील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. निवडणूक जाहीर झाल्यापासून तालुक्यात निवडणुकीचा धुराळा उडायला सुरुवात झाली होती. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायत निवडणूका या रंगीत तालीम म्हणून पहिल्या जात होत्या. तेव्हा या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारेल याकडे लक्ष लागले होते. तर यामुळेच या निवडणूका मोठ्या राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. तेव्हा सर्वानीच यासाठी जोर लावला होता. अशात दिनांक ५ रोजी झालेल्या मतदानानंतर आज दिनांक ६ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अंभेरपाडा येथे थेट सरपंच म्हणून अनुसूचित जमैती स्त्री यासाठी आरक्षण होते. येथे तिरंगी लढत झाली. यात लोखंडे लताबाई रामचंद्र यांनी ३६९ मते मिळवत लोहकरे स्विती महादेव यांचा पराभव केला.

खांडस येथे थेट सरपंच म्हणून अनुसूचित जमैती स्त्री यासाठी आरक्षण होते. येथे तिरंगी लढत झाली. यात लोखंडे लताबाई रामचंद्र यांनी ३६९ मते मिळवत लोहकरे स्विती महादेव यांचा पराभव केला. ओलमण येथे थेट सरपंच पदाच्या उमेदवार बेबी लक्ष्मण पारधी यांनी ९२६ मते मिळवत कांबडी गीता दत्तात्रेय यांना पराभूत करत विजय मिळवला आहे. खांडस येथे थेट सरपंच पदासाठी पादिर ताई कचरू यांनी ३० मतांनी विजय मिळवत योगिता वारगडे यांचा पराभव केला. तर या निवडणुकीत खांडस येथे भाजपने खाते उघडत चार सदस्य निवडून आणले आहेत. तर नांदगाव येथे थेट सरपंच पदासाठी चौरंगी लढत झाली यात प्रतिभा अशोक कारोटे यांनी ७१३ मते मिळवत भगवान मारुती चिमटे यांचा पराभव केला. वदप येथे थेट सरपंच पदासाठी दुहेरी अटीतटीची लढत होत यात पाटील राखी रोहित विजय संपादित करत वेखंडे छाया विनय यांचा पराभव केला आहे. गौरकामथ येथे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या थेट सरपंच पदासाठी चौरंगी लढत झाली. यात पवार आशा चंद्रकांत यांनी ७०८ मते मिळवत पवार गीता राम यांचा पराभव केला. दरम्यान नसरापूर येथील निवडणुकीला मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या भांडणाची किनार होती. त्यामुळे येथील निवडणूक हि संवेदनशील झाली होती. चोख पोलीस बंदोबस्तात येथील मतदान पार पडले असले तरी मतदार कुणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात आज जाहीर झालेल्या निकालात मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला. नसरापूर येथील निवडणुकीसाठी दुहेरी लढत झाली यात जयवंती जनार्दन कोळंबे यांनी १२९७ मते मिळवत तेजस्विता जितेंद्र दळवी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. तर कळंब येथील पोटनिवडणुकीत शेकापच्या करिश्मा सुनील ढोले यांनी ३३५ मते मिळवत सरिता सुभाष वाघ यांचा पराभव केला आहे.

गौरकामथ येथे शिंदे गटाने सरपंच पद काबीज केले असले तरी याठिकाणी सदस्यांमध्ये आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर ओलमन येथे प्रभाग क्रमांक १ मध्ये नोटाला मतदारांनी पसंती दिले असल्याचे चित्र होते. ८१५ वैध मतांमध्ये नोटाला १८८ मते मिळाली आहेत तर विजयी उमेदवार २९० मतांनी निवडून आला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page