मुंबई, प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये सध्या परप्रांतीयांची घुसखोरी वाढतच आहे. तर याज्यातील प्रत्येक रस्त्यावर या परप्रांतीय नागरिकांनी व्यवसाईक कब्जा केला आहे. अन्य क्षेत्रामध्येही आज परप्रांतीय आपले जाळे पसरत चालला आहे. ज्यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. तर परप्रांतामधून महाराष्ट्रामध्ये येणारा हा लोंढा आता महाराष्ट्रातील मराठी माणसाला धोका बनत चालला आहे. येथील मराठी तरुणांवर आता या परप्रांतीयकडून हल्ले होऊ लागले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली असून, मनसे वाहतूक सेना सरचिटणीस, जडअवजड वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी माणसाशी नीटच रहावे लागेल असा सज्जड दम दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयाची मुजोरी वाढत आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. अशाच प्रकारे मुंबई, वाडाळा येथे मुजोर प्ररप्रांतीयाकडून स्थानिक मराठी तरुणाला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस, जडवजड वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी हस्तक्षेप करत, सदर परप्रांतीयास मनसे स्टाईलने समज दिली. यावेळी या परप्रांतीय तरुणांने माफी मागून पुन्हा असा प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. तर प्रदीप वाघमारे यांनी महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी माणसांशी नीटच वागायचं अन्यथा मनसे स्टाईलने ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम मुजोर परप्रांतीयांना दिला आहे.
यामुळे आता परप्रांतीयांनकडून होणाऱ्या मराठी माणसाची हेळसांड थांबवण्यासाठी मनसेचे प्रदीप वाघमारे नक्कीच पुढकर घेताना दिसणार आहेत.