पनवेल, अजय शिवकर
केंद्र शासनाच्या युडायस प्लस ( Udise + ) ची माहिती भरण्यासाठी विद्यार्थ्याच्या रक्त गट नोंदी घेणे आवश्यक असल्यामुळे, सोमवार ६ नोव्हेंबर व मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी रा. जि. प. शाळ केळवणे येथे पनवेल मधील मायक्रो व्हिजन क्लिनिकल लेबोरेटरी व शाळा व्यवस्थापन समिती केळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त गट तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पमध्ये केळवणे शाळेतील ३६० व केळवणेपाडा शाळेतील ४५ असे एकूण ४०५ विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी करण्यात आली. एवढ्या मोठ्या शाळेमध्ये अशा प्रकारे रक्त गट तपासणी करणारी पनवेलमधील प्रथमच केळवणे शाळा असेल.