उरण, नगर परिषदेच्या जलतरण तलावामधून आर्यन विरेश मोडखरकर राष्ट्रीय स्तरावर जाणारा पहिला जलतरण पटू ठरला.

उरण, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य क्रीडा संचनालय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या अंतर शालेय क्रीडा स्पर्धेत, जलतरण स्पर्धेमध्ये आर्यन विरेश मोडखरकर याने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले स्थान मिळवले आहे. शुक्रवारी पुणे, बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्थीरीय जलतरण स्पर्धेमध्ये आर्यनने केलेल्या मेहनतीचे यश पदरात पाडून घेतले आहे. बॅकस्ट्रोक या प्रकारात त्याने द्वितीय क्रमांक मिळवून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्थान मिळवले आहे. यामुळे उरणच्या नगर परिषद जलतरण तलावामधून पहिला राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मान त्याने मिळवला आहे.

उरण तालुक्यातील आर्यन मोडखरकरने संपूर्ण रायगडकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंतर शालेय स्पर्धामधील जलतरण स्पर्धेयेच्या बॅककस्ट्रोक या जलतरण प्रकारात त्याने द्वितीय क्रमांक मिळवत आपले स्थान राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कायम केले आहे. उरणच्या “सेंट मेरीज कॉन्व्हेन्ट हायस्कुल” मध्ये इयत्ता १२ वी मध्ये शिकणारा आर्यन उरण नगर परिषदेच्या जलतरण तालावामध्ये सराव करत आहे. प्रशिक्षक हितेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेणाऱ्या आर्यनने आजवर अनेक बक्षिसे मिळवली आहेत. याआधी आर्यनने इंदोर येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण पदके मिळवली आहेत. तर नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. यामुळे त्याची ओळख आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अशी निर्माण झाली असली, तरी अंतरशालेय क्रीडा स्पर्धा या महत्वाच्या मानल्या जात असल्याने, या स्पर्धेमध्ये त्याला राष्ट्रीय स्थरावर आपले स्थान कायम करणे महत्वाचे होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page